चला बोलू या इंग्लिश विंग्लिश
मित्रांनो, आपण मराठी माध्यमात शिकलेल्या अनेक जणांना एक न्यूनगंड असतो की आपण सफाईदार इंग्रजी बोलू शकत नाही. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपली छाप पडत नाही असे आपल्याला वाटते.
आपले घरचे आणि शाळेतले सगळेच मराठीत बोलतात. त्यामुळे आपण मराठीतच मनातील विचार व्यक्त करू शकतो.
आपल्याला शाळेत इंग्रजी शिकवताना फारस संभाषण शिकवलं जात नाही.
तसेच परीक्षेमध्ये व्याकरणाची चूक झाली तर मार्क जातात.
आपल्या शाळेत इंग्रजी लीहिण्या वाचण्यावर जास्त भर असतो. इंग्रजी संभाषण करण्याकडे फार कमी शाळा लक्ष देतात. कधी तरी इंग्रजी च्या तासाला आपण इंग्रजीत संभाषण सुरू करतो. परंतु आपण व्याकरणाचे नियम पाळतो आहोत ना, योग्य शब्द बोलतो आहोत ना ह्याची खात्री नसल्याने आपण आत्मविश्वास गमावून बसतो.
तसेच न जाणो चूक झाली तर शिक्षक ओरडतील आणि वर्गमित्रांसमोर फजिती होईल म्हणून आपण इंग्रजी बोलायला घाबरतो.
आणि इंग्रजी बोलण्याचा सराव नसल्यामुळे आपल्यात एक न्यूनगंड तयार होतो.
तो न्यूनगंड बाजूला करून थोड्या सरावाने आणि अभ्यासाने तुम्ही सफाईदार इंग्रजी बोलू शकता.
काही सोपे उपाय मी माझ्या अनुभवातून तुमच्यासाठी घेऊन आले आहे.
1. तुम्हाला इंग्लिश का शिकायचंआहे हे ठरवा. जर तुमचं जीवन मरण ह्यावर अवलंबून नसेल तर तुम्ही टाळाटाळ करत राहणार .एक सबळ कारण शोधा,तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी.
अनेक तरुणांना मनाप्रमाणे नोकरी मिळण्यासाठी इंग्रजी संभाषण येण्याची गरज भासते.
काही जण जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत आहेत त्यांना on-site संधी मिळू शकतात.
काही जणांना आपलं काम सभा सेमिनार ह्या मधून मांडायच असतं.
काही जणांना नोकरीच्या ठिकाणी सगळे इंग्रजीत बोलतात म्हणून इंग्रजी संभाषण येण्याची गरज भासते.
काही तरुण असे असतात ज्यांना मित्र मैत्रिणी ह्यांच्यावर छाप पडायची असते.
सगळ्यात शेवटी येते, इंग्लिश Vinglish चित्रपटात दाखवलेली एक गृहिणी. जिला इंग्रजी येत नाही म्हणून कुटुंबियांकडून कसलाच मान मिळत नाही.
ह्यातले तुमचे सबळ कारण शोधा.
2. व्याकरणाची चिंता करू नका. बोलायला सुरुवात करा.अनेक लोक फक्त बोलतात. तंत्रशुद्ध आणि व्याकरणाच्या नियमात बसणारं फार थोडे बोलतात.
सरावाने तुम्ही तंत्रशुद्ध इंग्रजी बोलू शकाल.
3. रोज किमान अर्धा तास इंग्लिश ऐका. टीव्ही वर. किंवा अमेझॉन प्राईम, Netflix. असे काहीही ऐका.
Subtitles असतील तर ती इंग्रजी मध्ये सेट करा. म्हणजे जर तुम्हाला accent कळला नाही तरी शब्द कळतील.
सरावाने तो accent पण समजू लागेल.
तुमची मुलं टीव्ही बघत असताना कार्टून किंवा लहान मुलांच्या मालिका आवर्जून इंग्रजीत बघा. क्रिकेट मॅच चालू असताना त्याचे समालोचन commentary इंग्रजी मध्ये ऐका. बातम्या ईंग्रजी मध्ये ऐका. त्याने पण तुमच्या कानावर इंग्रजी भाषा पडत राहील.
4. लगेच आपल्या मुलांबरोबर इंग्रजीत बोलायला जाऊ नका. नवरा किवा बायको सुद्धा नको.
आपले कुटुंबीय आपल्या अगदी जवळचे असतात. आणि जर त्यांनी एखादी चूक काढली किंवा टीका केली तर ते आपल्या जिव्हारी लागू शकतं. आणि उरलासुरला उत्साह संपुष्टात येऊ शकतो.
म्हणून एखादी मैत्रीण किंवा मित्र पकडा. ज्याच्याबरोबर तुम्ही रोज इंग्रजीत संभाषण कराल.
5. रोज तुम्हाला इंग्रजी संभाषण करण्याचं कारण शोधा.
रोज नवीन नवीन ठिकाणी कसं इंग्रजीत बोलायचं हे बघा. त्यामुळे नवीन शब्द कानावर पडत राहतील. त्या शब्दांचा वापर कसा केला जातो हे बघा.
आजकाल net मुळे अनेक गोष्टी फार सुलभ झाल्या आहेत.
सततच्या अभ्यासाने आणि सरावाने तुमची इंग्रजी संभाषण करण्याची भीती दूर होईल.
असाध्य ते साध्य, करीता सायास
कारण अभ्यास, तुका म्हणे.
हा मंत्र लक्षात ठेवा.
असे साधे सोपे उपाय करून तुमची इंग्रजी संभाषण करण्याची भीती दूर होईल.
रोज अभ्यास आणि नियमित सराव केला तर काहीही अशक्य नाही.
तुमच्या मदतीसाठी मी घेऊन आले आहे,
चला बोलू या इंग्लिश विंग्लिश, ही फेसबुक आणि youtube सीरिज.
ती आवर्जून बघा. माझे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप, परीस स्पर्श ( The Midas touch) ह्यामध्ये सहभागी व्हा. त्याची लिंक मी येथे दिली आहे.
https://m.facebook.com/groups/members/search/?group_id=683311825547699&ref=bookmarks
माझ्या YouTube channelची लिंक देत आहे.
तसेच माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात हे मला जरूर सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर पुढील व्हिडिओ मध्ये मी त्यांचा समावेश करेन. तसेच काही सुधारणा करण्याची गरज असेल तर तेही सांगा.
आणि माझ्या व्हिडिओ ला लाईक आणि शेअर करा.
धन्यवाद. Thank you.🙏





Waa mastch
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाखूप छान मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाखूपच छान अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 या माहितीचा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि व्यवसायिक जीवनामध्ये खूपच चांगल्या प्रकारे फायदा होईल 🙏🙏
उत्तर द्याहटवाGreat 👍
उत्तर द्याहटवाVery nice Swati tai
उत्तर द्याहटवा