करिअर निवडीच्या पाच पायऱ्या

 करियर निवडीच्या पाच पायऱ्या 

*************************


मित्रांनो ,जर तुम्ही 15 ते 22 या वयोगटातील असाल ,तर तुमच्या पुढे एक महत्त्वाचा प्रश्न असेल , तो म्हणजे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? आणि नक्की काय करावे ? तुमच्या साठी योग्य करिअर कोणते ? आणि त्यासाठी कोणता अभ्यासक्रम करावा ? याबद्दल तुमच्या मनात संभ्रम असेल तर हा ब्लॉग पूर्णपणे वाचा. तसेच जर तुमचा पाल्य या वयोगटातील असेल तर आपणही हा ब्लॉग आवर्जून वाचा .

मी स्वाती अभंग , किशोरवयीन मुले व तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी मी परीसस्पर्श ( The Midas touch) हा मंच तयार केला आहे. त्यामध्ये अभ्यास सोडून बरच काही ही मालिका चालू आहे. तसेच मराठी माध्यमात शिकलेल्या अनेकांना इंग्रजी संभाषणाची भीती वाटते त्यासाठी चला बोलूया इंग्लिश-विंग्लिश ही मालिका चालू आहे .तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या इंग्रजी संभाषणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी माझा फेसबूक ग्रुप परिस स्पर्श यामध्ये सहभागी व्हा . 

चला तर करिअरची निवड कशी करायची हे आपण टप्प्याटप्प्याने बघू.


1. ध्येय निश्चित करा 



साधारण पाच ते दहा वर्षापर्यंत कालावधी घेऊन भविष्याची आखणी करा. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल आणि काय करायला आवडेल याची अगदी स्पष्ट तसली तरीही ढोबळ कल्पना तुमच्या मनात असू दे. त्यासाठी काय शिक्षण घ्यावे लागेल त्याचा सुद्धा विचार करा उदाहरणार्थ फॅशन डिझाइनिंग हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, अविएशन इंडस्ट्री एअर होस्टेस, अभिनयाचं क्षेत्र ,मॉडेलिंग अशी अनेक विविध क्षेत्र आहेत .यांच्यासाठी काही छोटे-मोठे कालावधीचे अभ्यासक्रम असतात .त्यात सहभागी व्हा .

तुम्हाला जर भाषेची आवड असेल तर त्यात तुम्हाला काय संधी आहे हे तुमच्या प्राध्यापकांबरोबर किंवा करियर कौन्सेलर बरोबर चर्चा करून ठरवा .


ध्येय निश्चत करण्यासाठी आवर्जून बघा. गोल सेटिंग with Mr Ketan Gawand.

Goal setting with Ketan Sir

2. तुमच्या छंदाला तुमचं करियर बनवा


 लहानपणापासून तुम्ही एखादा छंद जोपासला असेल आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या साधनेमुळे चांगली प्रगती केली असेल तर त्या छंदामध्ये पुढचं शिक्षण घ्या. उदाहरणार्थ वादन ,गायन ,चित्रकला हस्तकला, डेकोरेशन, इकेबाना. तुमच्या छंदाचं करियर मध्ये रूपांतर कसं करायचं यासाठी मी घेतलेला श्री श्रीराम हसबनीस यांचा इंटरव्यू बघा

छंद हेच करिअर


3. फक्त पैशाचा विचार करू नका.



 अनेक मुलं कोणत्या क्षेत्रात जास्त पैसा मिळतो? कुठे जास्त मान मरातब मिळतो? तिथे जाऊन करिअर करायला बघतात .अनेकांना डॉक्टर इंजिनीयर सीए किंवा एम बी ए करायचं असतं. पण हे अभ्यासक्रम अत्यंत कठीण असतात. त्यासाठी कुशाग्र बुद्धी लागते आणि रात्रंदिवस अभ्यास करण्याची तयारी सुद्धा. त्यासाठी आवश्यक ती बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे का? याचा विचार करा. कधीकधी सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेण्याइतपत पैसे आहेत का ? याचाही विचार करा. हे अभ्यासक्रम अतिशय खर्चीक असतात. त्यासाठी खूप सारं शैक्षणिक कर्ज तुम्हाला घ्यावे लागेल . नंतर मनासारखे यश नाही मिळालं तर आयुष्यभर अपयश, कर्जाचा बोजा ,आणि वैफल्य याशिवाय काहीही पदरी पडणार नाही. म्हणून तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असा अभ्यासक्रम निवडा.


4. करिअर कौन्सेलर ची मदत घ्या

 या तीन पायऱ्या नंतर जर तुम्हाला आपली दिशा सापडत नसेल . तर करिअर कौन्सेलर ची मदत घ्या .ते तुमच्या क्षमता आणि बाजारात असलेल्या संधी यांचा योग्य मेळ घालून तुम्हाला तुमच्या योग्यतेचा क्षेत्र किंवा अभ्यासक्रम सुचवू शकतात .कधीकधी DMIT किंवा सायको मॅट्रिक टेस्ट अशा चाचण्या करून तुमचा कल आणि क्षमता निर्धारित करता येतात .आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. श्रीयुत अजय दरेकर हे गेली सतरा वर्षे किशोरवयीन मुलं आणि नवतरुण यांना मार्गदर्शन करत आहेत. सध्या ते अभ्यास सोडून बरच काही ह्या मंचावरून खूप छान मार्गदर्शन करत आहेत . त्यांचे इंटरव्यू आवर्जून बघा आणि अभ्यास सोडून बरच काही ही मालिका बघत रहा.

अजय दरेकर ह्यांचे मार्गदर्शन

5 इकिगाई संकल्पनेचा वापर करा



आपण कोणत्या क्षेत्रात आणि नक्की काय काम करायचं? हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आपल्या आयुष्यात. यासाठी इकिगाई या जपानी संकल्पनेचा वापर करून आपल्यासाठी अत्यंत समाधान कारक असं क्षेत्र निवडा. इकिगाई मध्ये चार गोष्टींची सांगड घातली जाते .

A. तुम्हाला काय करायला आवडतं

B. तुम्हाला काय चांगलं करता येतं 

C. जगाला कशाची गरज आहे 

D. जग यासाठी पैसे द्यायला तयार आहे का , 

 या चार गोष्टींचा तुमच्या करियर निवडीसाठी वापर करून करिअर निवडलं तर तुम्ही जे करता त्यात तुम्हाला आनंद मिळेल . मनाजोगे पैसे मिळतील. जगाला अर्थपूर्ण योगदान देता येईल. आणि कृतार्थ जीवनाचा लाभ तुम्ही घेऊ शकाल . 

 इकिगाईची संकल्पना मी अभ्यास सोडून बरच काही च्या तिसऱ्या भागामध्ये स्पष्ट केली आहे . 

तर मित्रांनो तुमच्या करिअर विषयक प्रश्नांसाठी पहात रहा अभ्यास सोडून बरच काही त्यासाठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

परीस स्पर्श ( the Midas Touch)

तसेच माझे YouTube channel पण subscribe करा.

Swati Abhang

हा ब्लॉग पूर्णपणे वाचल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा