इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याची पंचसूत्री
*इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याची पंचसूत्री*
नमस्कार मित्रांनो.
मागच्या भागात रोजच्या वापरातील इंग्रजी बोलायला आपण शिकलो. मी तुम्हाला पाच सूत्रे सांगितली ज्यांनी तुम्ही आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकाल. पण जर तुम्ही अधिक प्रगती करू इच्छिता तर तुम्हाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कंपनीचा सीईओ बनायचंय का ? किमान व्हाईस प्रेसिडेंट तरी? ते कॉर्नरचे ऑफिस हवे आहे का?
असं जर असेल तर तुम्हाला अनेक प्रेझेंटेशन्स, क्लाइंट मीटिंग आणि आपल्या सहकार्यांच्या बरोबर मिटींग्स कराव्या लागतात .मीटिंगमध्ये व्यक्त होण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार चांगल्या इंग्रजीमध्ये व्यक्त करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी फक्त कामचलावू नाही तर प्रभावशाली इंग्रजी बोलणं आवश्यक आहे . तसंच जर तुमची भाषा चांगली असेल तर तुम्ही इतरांवर आपली छाप पाडू शकता आणि त्यांचे मन जिंकू शकता . या सगळ्याचा उपयोग तुम्हाला कॉर्पोरेटची शिडी (corporate ladder) चढण्यासाठी नक्कीच होईल. आणि तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला बढती पण मिळेल .चला तर बघूया कसं प्रभुत्व मिळवायचं इंग्रजीवर ते.
*1. तुमचं वाचन चालू ठेवा*
मित्रांनो जेव्हा आपल्याला साधं घरगुती वापरातील इंग्रजी बोलायचं असतं तेव्हा वाचनाची तितकीशी गरज नसते. पण जर तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वाचनाला पर्याय नाही. तुम्हाला तुमच्या विषयाचं अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी पुस्तकं ,तुमच्या विषयांमधील पेपर्स, शोधनिबंध हे सतत वाचायला हवेत. याच बरोबर इंग्रजीमध्ये जे क्लासिक आहेत असे वांग्मय तुम्ही वाचलं पाहिजे. आपण बहुतांश जण मोटिवेशनल पुस्तक वाचतो ; परंतु भाषेवर प्रभुत्व हवं असेल तर त्या भाषेतील ( classic literature) अभिजात साहित्य आपण वाचायला हवं. हे अभिजात साहित्य वाचल्याने तुमचं इंग्रजीवरील प्रभुत्व तर वाढेलच, पण तुमचा जीवन विषयक दृष्टिकोन अधिक व्यापक, अधिक सखोल व्हायला सुद्धा मदत होईल.
Leaders are readers. हे तत्त्व विसरू नका.
*2. रोज चांगलं इंग्रजी ऐका*
तुम्हाला जर काही दिवसांसाठी अमेरिका किंवा युरोप किंवा सिंगापूर अशा ठिकाणी जायचं असेल. आणि तिथे क्लायंट मीटिंग किंवा सहकार्यांबरोबर च्या मीटिंग मध्ये तुम्हाला चांगला इंग्रजी बोलणं आवश्यक आहे तर त्यासाठी रोज तासभर उत्कृष्ट इंग्रजी ऐका. टीव्हीवर काही अँकर्स खूप चांगलं इंग्रजी बोलतात. त्यांना जरूर ऐका. जर तुम्हाला एखादा वक्ता आवडत असेल तर त्याचं इंग्रजी संभाषण ऐकण्यासाठी त्याची भाषण ऐका.आज-काल युट्युब वर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ; तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला नवीन शब्द शिकता येतीलच पण त्याचा उच्चार कसा करावा हेही शिकता येईल.
*3. शब्दसंपदा वाढवा*
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इंग्रजीत बोलू शकता पण तुमची शब्दसंपदा कमी आहे तर त्यासाठी तुम्ही शब्दसंपदा वाढवण्याची पुस्तक उपलब्ध आहेत त्यांचा वापर करू शकता. काही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत. ( उदा. Norman Lewis यांचं Word power made easy)
ज्या त्या ठिकाणी योग्य शब्द वापरल्याने तुमचं बोलणं मुद्देसूद आणि प्रभावी व्हायला मदत होते. तसंच शब्दसंपदा वाढल्याने नवीन संकल्पना तुम्हाला कळतात . आणि पुढे नवनवीन विषयांवरील पुस्तक वाचताना तुमचा वेळ वाचू शकतो.
*4. व्याकरण शुद्ध बोला*
जर तुम्हाला व्याकरणा मध्ये अडचण येत असेल तर आपलं व्याकरण चांगलं होण्यासाठी प्रयत्न करा. व्याकरणासाठी काही प्रसिद्ध पुस्तक आहेत. ( उदा. Wren and Martin) त्यांचा अभ्यास करा .पुस्तकांऐवजी तुम्ही इंटरनेट वर पण मदत मिळवू शकता.
*5. रीतसर अभ्यासक्रम जॉईन करा*
जर तुम्हाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं आहे पण तसं पोषक वातावरण मिळत नाहीये तर एखादा अभ्यासक्रम जॉईन करा. इंटरनेटवर अनेक अभ्यासक्रम तुम्हाला मिळतील. हवं तर तुम्ही GMAT,GRE किंवा CAT यांचा इंग्रजीचा अभ्यास करू शकता. त्यांनी पण तुमचं इंग्रजी सुधारेल. याव्यतिरिक्त नवनवीन व्यवस्थापनाच्या संकल्पनांचा अभ्यास करत रहा. मी चला बोलू या इंग्लिश विंग्लिश हा अभ्यासक्रम घेऊन आले आहे त्यामध्ये नाव नोंदवा.
माझा फेसबूक ग्रुप परीस स्पर्श ( the Midas touch) जॉईन करा.
https://m.facebook.com/groups/members/search/?group_id=683311825547699&refid=18&ref=group_browse
जर तुम्ही या पाचही पातळ्यांवर काम केलं तर वर्षा-दोन वर्षात तुम्हाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता येईल.आणि बॉस ची खुर्ची व ते कॉर्नर ऑफिस दोन्ही मिळून जाईल.
*ऑल द बेस्ट*
तुमच्या पुढील प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा





खूप छान टिप्स .
उत्तर द्याहटवाUseful blog 👍👍
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवाKhoopach chan mahiti dili 👏👏💐
उत्तर द्याहटवाKhoop chan information
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाkhup chaan mahiti aahe. this is help me lot thanku
उत्तर द्याहटवाIn Detail and Informative blog
उत्तर द्याहटवाPerfect blog
उत्तर द्याहटवा