पोस्ट्स

करिअर निवडीच्या पाच पायऱ्या

इमेज
 करियर निवडीच्या पाच पायऱ्या  ************************* मित्रांनो ,जर तुम्ही 15 ते 22 या वयोगटातील असाल ,तर तुमच्या पुढे एक महत्त्वाचा प्रश्न असेल , तो म्हणजे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? आणि नक्की काय करावे ? तुमच्या साठी योग्य करिअर कोणते ? आणि त्यासाठी कोणता अभ्यासक्रम करावा ? याबद्दल तुमच्या मनात संभ्रम असेल तर हा ब्लॉग पूर्णपणे वाचा. तसेच जर तुमचा पाल्य या वयोगटातील असेल तर आपणही हा ब्लॉग आवर्जून वाचा . मी स्वाती अभंग , किशोरवयीन मुले व तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी मी परीसस्पर्श ( The Midas touch) हा मंच तयार केला आहे. त्यामध्ये अभ्यास सोडून बरच काही ही मालिका चालू आहे. तसेच मराठी माध्यमात शिकलेल्या अनेकांना इंग्रजी संभाषणाची भीती वाटते त्यासाठी चला बोलूया इंग्लिश-विंग्लिश ही मालिका चालू आहे .तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या इंग्रजी संभाषणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी माझा फेसबूक ग्रुप परिस स्पर्श यामध्ये सहभागी व्हा .  चला तर करिअरची निवड कशी करायची हे आपण टप्प्याटप्प्याने बघू. 1. ध्येय निश्चित करा  साधारण पाच ते दहा वर्षापर्यंत कालावधी घेऊन भविष्य...

चला बोलू या इंग्लिश विंग्लिश

इमेज
 मित्रांनो, आपण मराठी माध्यमात शिकलेल्या अनेक जणांना एक न्यूनगंड असतो की आपण सफाईदार इंग्रजी बोलू शकत नाही. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपली छाप पडत नाही असे आपल्याला वाटते. आपले घरचे आणि शाळेतले सगळेच मराठीत बोलतात. त्यामुळे आपण मराठीतच मनातील विचार व्यक्त करू शकतो. आपल्याला शाळेत इंग्रजी शिकवताना फारस संभाषण शिकवलं जात नाही. तसेच परीक्षेमध्ये व्याकरणाची चूक झाली तर मार्क  जातात. आपल्या शाळेत इंग्रजी लीहिण्या वाचण्यावर जास्त  भर असतो. इंग्रजी संभाषण करण्याकडे फार कमी शाळा लक्ष देतात. कधी तरी इंग्रजी च्या तासाला आपण इंग्रजीत संभाषण सुरू करतो. परंतु आपण व्याकरणाचे नियम पाळतो आहोत ना, योग्य शब्द बोलतो आहोत ना ह्याची खात्री नसल्याने आपण आत्मविश्वास गमावून बसतो. तसेच न जाणो चूक झाली तर शिक्षक ओरडतील आणि वर्गमित्रांसमोर फजिती होईल म्हणून आपण इंग्रजी बोलायला घाबरतो. आणि इंग्रजी बोलण्याचा सराव नसल्यामुळे आपल्यात एक न्यूनगंड तयार होतो. तो न्यूनगंड बाजूला करून थोड्या सरावाने आणि अभ्यासाने तुम्ही सफाईदार इंग्रजी बोलू शकता. काही सोपे उपाय मी माझ्या अनुभवातून तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 1...

इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याची पंचसूत्री

इमेज
  * इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याची पंचसूत्री * नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात रोजच्या वापरातील  इंग्रजी बोलायला आपण शिकलो. मी तुम्हाला पाच सूत्रे सांगितली ज्यांनी तुम्ही  आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकाल. पण जर तुम्ही अधिक प्रगती करू इच्छिता तर तुम्हाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कंपनीचा सीईओ बनायचंय का ? किमान व्हाईस प्रेसिडेंट तरी?  ते  कॉर्नरचे ऑफिस हवे आहे का?   असं जर असेल तर तुम्हाला अनेक प्रेझेंटेशन्स, क्लाइंट मीटिंग आणि आपल्या सहकार्‍यांच्या बरोबर  मिटींग्स कराव्या लागतात .मीटिंगमध्ये व्यक्त होण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार चांगल्या इंग्रजीमध्ये व्यक्त करणे खूप आवश्यक आहे.  त्यासाठी फक्त कामचलावू नाही तर प्रभावशाली इंग्रजी बोलणं आवश्यक आहे . तसंच जर तुमची भाषा चांगली असेल तर तुम्ही इतरांवर आपली छाप पाडू शकता आणि त्यांचे मन जिंकू शकता . या सगळ्याचा उपयोग तुम्हाला कॉर्पोरेटची शिडी (corporate ladder) चढण्यासाठी नक्कीच होईल. आणि तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला बढती पण मिळेल .चला तर बघूया कसं प्रभुत्व मिळवायचं इंग्...

Online Swarajya Course

इमेज
  ऑनलाईन स्वराज्य कोर्स करण्याची पाच कारणे मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? तुम्ही तरुण आहात का ? आणि व्यवसायामध्ये, नोकरी मध्ये आपली प्रगती कशी करता येईल याचा विचार करत आहात का? तुम्ही एक सुशिक्षित गृहिणी आहात का जीची मुलं लहान आहेत? त्यामुळे तुम्हाला घरी बसावे लागत आहे आणि काय काम धंदा करावा असा तुमचा विचार आहे? तुम्ही मध्यमवयीन गृहिणी आहात का ? रिकामा वेळ तुम्हाला खायला उठतो आहे का ? तुम्ही मध्यमवयीन पुरुष आहात का, आणि तुम्ही जे काम करत आहात त्या कामांमध्ये तुम्हाला कंटाळा आला आहे का ? किंवा तुमची प्रगती होत नाही असे वाटत आहे का? तुम्ही जेष्ठ नागरिक आहात का? इतके दिवस इतरांसाठी जगलो, कुटुंबासाठी झटलो आता स्वतःसाठी जगायचं आहे का ? आणि त्याच बरोबर समाजाला काही देणं द्यायचं आहे का ? तुम्हाला एक कृतार्थ जीवन जगायचा आहे का?  यातल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वराज्य कोर्स केलाच पाहिजे . नमस्कार ,मी स्वाती अभंग . मी माझ्या लग्नानंतर प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे घरीच होते आणि आपण काहीच करत नाही अशी भावना मला वेढून राहिली होती .त्यामुळे मला निराश पण व्हायला झाले...

चला बोलू या इंग्लिश विंग्लिश

 मित्रांनो, आपण मराठी माध्यमात शिकलेल्या अनेक जणांना एक न्यूनगंड असतो की आपण सफाईदार इंग्रजी बोलू शकत नाही. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपली छाप पडत नाही असे आपल्याला वाटते. आपले घरचे आणि शाळेतले सगळेच मराठीत बोलतात. त्यामुळे आपण मराठीतच मनातील विचार व्यक्त करू शकतो. आपल्याला शाळेत इंग्रजी शिकवताना फारस संभाषण शिकवलं जात नाही. तसेच परीक्षेमध्ये व्याकरणाची चूक झाली तर मार्क कापले जातात. आपल्या शाळेत इंग्रजी लीहिण्या वाचण्यावर जास्त  भर असतो. इंग्रजी संभाषण करण्याकडे फार कमी शाळा लक्ष देतात. कधी तरी इंग्रजी च्या तासाला आपण इंग्रजीत संभाषण सुरू करतो. परंतु आपण व्याकरणाचे नियम पाळतो आहोत ना, योग्य शब्द बोलतो आहोत ना ह्याची खात्री नसल्याने आपण आत्मविश्वास गमावून बसतो. तसेच न जाणो चूक झाली तर शिक्षक ओरडतील आणि वर्गमित्रांसमोर फजिती होईल म्हणून आपण इंग्रजी बोलायला घाबरतो. आणि इंग्रजी बोलण्याचा सराव नसल्यामुळे आपल्यात एक न्यूनगंड तयार होतो. तो न्यूनगंड बाजूला करून थोड्या सरावाने आणि अभ्यासाने तुम्ही सफाईदार इंग्रजी बोलू शकता. काही सोपे उपाय मी माझ्या अनुभवातून तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 1...